Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized'लोटिस्मा' वाचनालयात महाराष्ट्र दिनी गुणवंत ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा सन्मान

‘लोटिस्मा’ वाचनालयात महाराष्ट्र दिनी गुणवंत ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा सन्मान

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात वाचन संस्कृती साठी योगदान देणाऱ्या शहरातील विविध वाचनालयांच्या गुणवंत ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी, वाचनालयाच्या प्रांगणात ज्येष्ठ साहित्यिक, समन्वयक प्रकाश देशपांडे यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शहरातील लोटिस्मासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, घरडा  वाचनालयातील कर्मचाऱ्यांना शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रंथपाल सौ गौरी भोसले यांचा सन्मान प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते शाल रोख रक्कम आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. सहाय्यक ग्रंथपाल संदीप जाधव यांचा सन्मान सुनील खेडेकर यांच्या हस्ते, लिपिक सौ दीक्षा जाधव यांचा सन्मान अनिल धोंडये यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या ग्रंथपाल तेजश्री सोमण, कर्मचारी हर्षाली जाधव, सुरेखा सावंत आणि घरडा वाचनालयाच्या कावेरी गोरीवले, समीरा चिले यांचा कार्याध्यक्ष अरुण इंगवले, सौ. संध्या साठे जोशी, सौ. प्राची जोशी. सौ मानसी पटवर्धन, डॉ. संध्या देशपांडे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंगवले यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्या समन्वयातून वाचनालयाचे कार्य कसे सुसह्य होत असते ते सांगितले. विनायक ओक यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाची माहिती दिली. यावेळी लोटिस्माचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, उपाध्यक्ष सुनील खेडेकर, सहकार्यवाह विनायक ओक, संचालक धीरज वाटेकर, अनिल धोंडे, सौ. मानसी पटवर्धन, प्रकाश घायाळकर, संध्या साठे-जोशी, प्राची जोशी, डॉ. संध्या देशपांडे, विलास महाडिक, कोवळे आणि लोटिस्मासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, घरडा वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments