चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या वतीने येथील घरडा वाचनालयाला २० हजार रुपयांचे आर्थिक अनुदान देण्यात आले. नगराध्यक्ष मा. उमेश सकपाळ यांच्या हस्ते हा धनादेश वाचनालयाचे अध्यक्ष श्री गिरीश बांदिवडेकर व कोषाध्यक्ष श्री विनायक ओक यांनी स्वीकारला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष श्री सकपाळ यांनी चिपळूण शहरातील वाचनालये ही बौद्धिक संपत्ती असल्याचा अभिमान व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, लोटिस्मा व घरडा वाचनालय यांना नगरपरिषद सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आभार प्रदर्शन करताना वाचनालयाचे अध्यक्ष श्री गिरीश बांदिवडेकर यांनी सांगितले की, घरडा वाचनालयाने प्रथमच अशा प्रकारच्या अनुदानासाठी अर्ज केला होता. नगरपरिषदेने सहानुभूतीपूर्वक विचार करून अनुदान मंजूर केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी वाचनालयाचे कोषाध्यक्ष श्री विनायक ओक यांनी वाचनालयाच्या वतीने ग्रंथ भेट देऊन नगराध्यक्षांचा सत्कार केला.
घरडा वाचनालयाला चिपळूण नगर परिषदेचे २० हजारांचे अनुदान
RELATED ARTICLES



