Saturday, May 2, 2026
Google search engine
Homeरत्नागिरीचिपळूणरत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल वृंदांचे 17 रोजी चिपळुणात 21 वे वार्षिक स्नेहसंमेलन

रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल वृंदांचे 17 रोजी चिपळुणात 21 वे वार्षिक स्नेहसंमेलन

रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल वृंदांचे 17 रोजी चिपळुणात 21 वे वार्षिक स्नेहसंमेलन
चिपळूण : रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल वृंद, चिपळूण उपविभाग यांच्या वतीने 21 वे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार, दि. 17 जानेवारी रोजी राधाताई लाड सभागृह खेंड चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व उपविभागातील सेवानिवृत्त महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या स्नेहसंमेलनात सहभागी होणार आहेत.
या स्नेहसंमेलनाची सुरुवात सकाळी 9 ते 11 या वेळेत अल्पोपहाराने होणार असून, सकाळी 11 वाजता मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन, 11.15 वाजता स्वागत गीत व कोकण गौरव गीत सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 11.30 वाजता, तर 11.45 वाजता स्मरणिका 2026 चे प्रकाशन होणार आहे. दुपारी 12 वाजता वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त महसूल वृंदांचा, तसेच 12.30 वाजता सत्कार करण्यात येणार आहे.
दुपारी 1 वाजता डॉ. सुनील कोतकुंडे यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असून, त्यानंतर विवाहास 50 वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त महसूल दांपत्यांचा विशेष सत्कार होणार आहे. दुपारी 1.30 वाजता तालुका अध्यक्षांचे मनोगत व शुभेच्छा, तर 2 वाजता स्नेहभोजन ठेवण्यात आले आहे. दुपारी 3 ते 5 या वेळेत सेवानिवृत्त महसूल वृंदांचा सांस्कृतिक कार्यक्रम ‌‘रंजन संध्या‌’ होणार असून, कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षांचे मनोगत व आभार प्रदर्शन करण्यात येणार आहे.
सदर स्नेहसंमेलनास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सेवानिवृत्त महसूल वृंद, चिपळूण उपविभागाचे अध्यक्ष यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments