राजलक्ष्मी दिनदर्शिका लोकप्रियता ; दहाव्या वर्धापनदिनी चाहत्याने कॅलेंडरचे नाव केसांमध्ये कोरले
चिपळूण : येथील राजसत्ता वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल चे संपादक संतोष उर्फ राज पिलके यांनी 2016 मध्ये शुभारंभ केलेली राजलक्ष्मी दिनदर्शिका हिला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. या दिनदर्शिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून याचे ग्राहक,वाचक आणि जाहिरातदार चिपळूण प्रमाणे रत्नागिरी जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत.
याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून या दिनदर्शिकेचा चाहता वर्ग देखील खूप मोठ्या संख्येने निर्माण होत आहे. याची च प्रचिती म्हणून एका चिपळूण मधील चाहत्याने राजलक्ष्मी दिनदर्शिका चे नाव आपल्या डोक्यावरील केसांमध्ये कोरले आहे. नरेश माजलेकर असे त्याचे नाव आहे.याकडे एक आकर्षण म्हणून पाहिले जात असतानाच अशा प्रकारची लोकप्रियता प्रथमच पाहायला मिळत असल्याने नागरिकांमधून हा एक कौतुकाचा विषय ठरत आहे.
याबाबत राजलक्ष्मी दिनदर्शिकेचे संपादक संतोष उर्फ राज पिलके यांनी सर्व ग्राहक, वाचक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांनी दिलेल्या पाठिंबाबद्दल आभार व्यक्त करून भविष्यात देखील अशाच प्रकारे राजलक्ष्मी दिनदर्शिका सोबत सर्वजण राहाल आणि वाढता भरघोस पाठिंबा मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.



