Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*वेळंबमध्ये उबाठाला खिंडार* *वेळंब गुरववाडीतील उबाठा पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश*

*वेळंबमध्ये उबाठाला खिंडार* *वेळंब गुरववाडीतील उबाठा पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश*

गुहागर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्येच वेळंब गावातील उबाठा शाखाप्रमुख अमोल अशोक गुरव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाजपाचे माजी आम. डॉ. विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे मळण पंचायत गणामध्ये आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून विजय निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
मळण पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या उमेदवार मानसी मंगेश रांगले आणि कोंडकारूळ जिल्हा परिषद गटाकडून अपूर्वा बारगुडे या निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेळंब गावातील उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश हे दोन्ही उमेदवारांना मिळालेली विजयाची खात्रीच आहे. उबाठा वेळंबचे शाखाप्रमुख अमोल अशोक गुरव, कुणबी समाज संघटना गाव अध्यक्ष मंगेश घडशी, प्रमोद निकम,नितेश गुरव त्यांच्या समवेत संपूर्ण गुरव वाडीने आज डॉ. विनय नातू यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण हा पक्ष प्रवेश करत असल्याचे पक्षप्रवेश शाखाप्रमुख अमोल गुरव यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर. तालुका सरचिटणीस संतोष सांगळे, सचिन ओक, गुहागरच्या नगराध्यक्ष नीता मालप, जिल्हा परिषद उमेदवार डॉ. राजेंद्र पवार, अपूर्वा बारगुडे, मानसी रांगले. नगरसेविका मीरा घाडे, विशाखा सोमण, भाजपाचे पदाधिकारी दीपक मोरे, मंगेश रांगले. दिनेश बागकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments