मंडणगड (प्रतिनिधी) : शांती सद्भावना व अहिसंच्या मार्गान गांधीजींनी विश्वास कल्याणाच्या मार्गावर नेणार असल्याने ते जगात स्विकारले जात आहेत. त्यात अखिल विश्वाचे प्रगतीचे मार्ग दडलेला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ लेखक व गांधीवादी विचारवंत मि.प्र. तथा बापू शेठ यांनी भिंगळोली येथे केले. गांधीजीचे स्मृती दिनाचे ३० जानेवारी रोजी कॉंग्रेस राष्ट्र सेवा दलाचे तालुका अध्यक्ष मोतीराम चव्हाण यांचे निवास स्थानी गांधीजींचे छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बापू शेठ पुढे म्हणाले की, गांधी ही केवळ व्यक्ती नव्हे तर तो एक विचार व तत्वज्ञान होते, त्यामुळे या कालतीत व्यक्तीमत्वाच्या मानवतेच्या कल्याणाचा विचार जगाने स्विकारला आहे. अध्यात्म, ग्रामविकास, समाजकारण, राजकारण, तत्वज्ञान अशा अनेक विषयात व्यक्ती म्हणून त्यांनी केलेले चिंतन मानवास शांतीचे मार्गाने कल्याणाकडे नेणार असल्याने बदलत्या काळातील वेगवेगळ्या अभिनिवेशातही गांधी विचार कालातीत आहेत विश्व व सृष्टी चा विनाश रोखणारे असल्याचे सांगीतले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उदय देशपांडे यांनी भुषविले. कार्यक्रमास मोतीराम चव्हाण, सुनील आईनकर, पत्रकार विनोद पवार, विजय जोशी, शिल्पा आईनकर यांच्यासह परिरसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
स्मृतिदिनाचे निमित्ताने महात्मा गांधी यांना अभिवादन करताना लेखक बापू शेठ व कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.



