Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत आपल्या परिसरात जनजागृती करणे आवश्यक -नोडल अधिकारी सौ. कल्याणी मुळे*...

*विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत आपल्या परिसरात जनजागृती करणे आवश्यक -नोडल अधिकारी सौ. कल्याणी मुळे* *मंडणगडमध्ये विद्यार्थ्यांची पथनाटयाच्या माध्यमातून मतदान जनजागृती*

मंडणगड(प्रतिनिधी) : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयतील एन.एस.एस. विभाग व महाराष्ट्र शासन स्वीप व्यवस्थापन कार्यक्रम तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तहसील कार्यालय, निवडणूक विभाग मंडणगड यांच्या सहकार्याने मुंडे महाविद्यालयात व मंडणगड शहरामध्ये ‘मतदान जनजागृती’अभियाना अंतर्गत ‘मतदार जनजागृती पथनाटय’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. कल्याणी मुळे, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, प्रा. हनुमंत सुतार, डॉ.महेश कुलकर्णी, प्रा. अशोक कंठाळे, महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, पंचायत समितीचे श्री. रेवाळे सर, प्राथमिक शिक्षक कुणाल आंधळगावकर, किशोर आंधळे, किशोर देवकर, बुधावले सर, रजपूत मॅडम, पदूमले सर, चाफळकर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नोडल अधिकारी सौ. कल्याणी मुळे यांनी सांगितले की, दिवसेंदिवस कमी होत चाललेली मतदानाची टक्केवारी लक्षात घेऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याबाबत जनजागृती करणे गरजेचे बनले आहे. विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत आपल्या परिसरात जनजागृती करणे आवश्यक आहे. आपल्या देशात लोकशाही टिकवायची असेल तर एक चांगला व सक्षम उमेदवार निवडण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना प्रा. अशोक कंठाळे यांनी ‘मतदार जनजागृती’ प्रतिज्ञा दिली. यानंतर एन.एस.एस. विभागाच्या विद्यार्थ्यांनी मंडणगड बस स्टॅन्ड व शहरामध्ये मतदान जनजागृती या विषयावर पथनाटय सादर करुन मतदान जनजागृती केली. शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार डॉ. महेश कुलकर्णी यांनी मानले.

मतदान जनजागृती पथनाटय सादर करताना महाविद्यालयाचे स्वयंसेवक-स्वयंसेविका व प्रेक्षक वर्ग.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments