दालन शुभारंभ होऊन दोनच दिवस ; अजित दादांना श्रद्धांजलीचा बॅनर लावून दुकान ठेवले पूर्ण बंद
तरुण उद्योजकांची अशीही श्रद्धांजली
चिपळूण : शहरामध्ये 25 जानेवारी 2026 रोजी लाइट्स ऑन – ई मार्ट या इलेक्ट्रॉनिक्स दालनाचा शुभारंभ होऊन दोनच दिवसानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजित दादा पवार दिवंगत झाल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. याच वेळी चिपळूणमध्ये दोन तरुण उद्योजक जावेद आणि जुनेद बोट यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपले दोन दिवसांपूर्वी शुभारंभ केलेले दालन बंद ठेवून त्या दालनावर अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा मला मोठा बॅनर लावून एक कर्तव्यदक्ष व्यक्तीबद्दल आदर भावना व्यक्त करून पूर्ण दिवस दुकान बंद ठेवले.आणि अंतकरणापासून या दोन बंधूंनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली.नव्याने सुरू झालेल्या दालनावर अजितदादांच्या श्रद्धांजली चा बॅनर लावताना कशाचाही संकोच न बाळगता केवळ आणि केवळ माणूसकी व दादांच्या कर्तृत्वातील भला माणूस पुन्हा होणे नाही या एकाच भावनेने या दोन भावांची कृती समस्त चिपळूण वासियांना भावली. या निमित्ताने संस्कृत चिपळूण आणि या चिपळूण मध्ये जपली जाणारी सर्वधर्मसमभावची शिकवण, संस्कृती दिसून आल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.
जावेद आणि जुनेद बोट यांनी नुकतेच लाईटस ऑन हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भव्य दलाल सुरू केले.या दोन बंधूंनी अतिशय कष्ट,चिकाटी आणि प्रामाणिकपणा या बळावर इथपर्यंत मजल मारली आणि आपल्या कार्याशी प्रामाणिक राहण्याचा केलेला प्रयत्न याचमुळे हे दालन चिपळूण मध्ये उभे झाल्याचे देखील पाहिले जात आहे.



