चिपळूण (प्रतिनिधी) : युनायटेड मास्टर्स स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल नाशिक येथे दि.२६ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान नॅशनल स्पर्धा घेण्यात आल्या. स्विमिन्ग च्या स्पर्धा वीर सावरकर जलतरण तलाव येथे घेण्यात आल्या. त्यामध्ये सर्व राज्यांचा सहभाग होता. ८०+ पर्यंतच्या वयोगटातील खेळाडू सहभागी होते. यामध्ये ऍथलेटिक्स थ्रोविंग, पोहोणे, बॅडमिंटन, लांबउडी, उंचउडी, पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग, कबड्डी, हॉलिबॉल, फुटबॉल ई. क्रीडाप्रकार घेण्यात आले. निशाताई हिने ४५+ वयोगटात थाळीफेक, गोळफेक, हॅमर थ्रो, ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर फ्री स्टाईल पोहोणे यामध्ये ६ सुवर्णं पदके तर कबड्डीमध्ये रौप्य पदक प्राप्त केले, त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
चिपळूण सायकलिंग क्लबच्या उपाध्यक्ष एस. आर. सुवर्णकन्या निशा आंबेकरांची राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदकांची लूट
RELATED ARTICLES



