खेड शहरालगत असलेल्या खारी नांदगाव परिसरात रविवारी सायंकाळी एका अपंग व्यक्तीच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघातात दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या चोंड्यात जाऊन कोसळली. मात्र, अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दुचाकीपासून काही अंतरावर मांसाचे तुकडे पडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब समोर येताच परिसरात तरुणांची मोठी गर्दी जमली. अपघातग्रस्त दुचाकीस्वार याच दुचाकीवरून मांसाची वाहतूक करत होता, अशा चर्चांना घटनास्थळी उधाण आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. रस्त्यालगत तसेच शेताच्या परिसरात आढळलेले मांसाचे तुकडे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. संबंधित दुचाकीस्वाराचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
खेडमध्ये दुचाकीचा अपघात, गाडीतून पडले जनावराच्या मांसाचे तुकडे?
RELATED ARTICLES



