Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*सिजीपीएचे गॅदरिंग ‘नादब्रह्म’ दिमाखात संपन्न*

*सिजीपीएचे गॅदरिंग ‘नादब्रह्म’ दिमाखात संपन्न*

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले वार्षिक गॅदरिंग ‘नादब्रह्म २०२६’ हे भव्य सोहळा नुकताच हॉटेल डी स्टार रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साहात पार पडला. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सिजीपीए स्पोर्ट्स स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गॅदरिंगच्या पहिल्या सत्रात आयोजित करण्यात आला. डॉ. हर्षद परब, डॉ.संदीप भागवत आणि डॉ. अभिजीत सावंत यांच्याकडून, सीजीपीए’ हॉल ऑफ फेम अवॉर्ड ‘स्वीकारताना डॉ.रणजीत पाटील, सोबत सौ. नेत्रा पाटील, डॉ.श्रीजीत पाटील आणि कमिटी मेंबर्स. या बक्षीस वितरण समारंभासाठी अवनीश हॉस्पिटलचे संचालक डॉ. हर्षद परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर श्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभिजीत सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सिजीपीएचे अध्यक्ष डॉ. संदीप भागवत यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी, “व्यस्त वैद्यकीय सेवेतून थोडा वेळ काढून कुटुंबीय व मित्रमंडळींसोबत आनंदाचे क्षण घालवणे गरजेचे आहे. म्हणूनच सिजीपीए गॅदरिंग दरवर्षी उत्साहात व्हायला हवे,” असे सांगितले. डॉ. हर्षद परब यांनी सर्व सिजीपीए डॉक्टरांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. स्पोर्ट्स बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. अरुण पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. यावेळी सिजीपीए असोसिएशनचे मान्यवर डॉ. रणजीत पाटील यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि संघटनेसाठी केलेल्या भरीव कार्याबद्दल ‘सिजीपीए Hall of Fame Award’ देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर सिजीपीए गॅदरिंग- नादब्रह्म २०२६ या सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. सिजीपीए परिवारातील डॉक्टरांनी संगीत, कराओके गीते, नृत्य तसेच विनोदी व सामाजिक संदेश देणारी स्किट्स मोठ्या उत्साहात सादर केली. डॉ. चेतन पाटील, डॉ. सागर पाटील व त्यांच्या ग्रुपने, तसेच डॉ. गौरी कदम, डॉ. श्वेता पाटील, डॉ. सुविधा बेल्लारीकर, डॉ. रितिका दळी, डॉ. गार्गी होन, डॉ. श्रुती दाभोळकर, डॉ. निधी शिंदे, ऊर्जा ग्रुप, डॉ. जस्मिन औताडे, डॉ. विशाल पेटकर यांच्या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. इकलाख खतीब, डॉ. संदीप दाभोळकर, डॉ. श्रीजीत पाटील, डॉ. राजीव दंडगे तसेच इतर डॉक्टरांच्या कराओके गाण्यांनी आणि सावर्डे ग्रुपच्या स्किट्सने उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले. विशेष उल्लेखनीय ठरले जागतिक स्तरावर कोकणची ओळख निर्माण करणाऱ्या ‘वस्त्रहरण’ या मनोरंजनप्रधान स्किटचे सादरीकरण. डॉ. गौरव गांगण, डॉ. ऋषिकेश चितळे व त्यांच्या ग्रुपने सादर केलेल्या या नाटकाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. मंगेश वाजे आणि डॉ. रणजीत पाटील यांनी केले. सुमारे साडेपाच तास सलग चाललेल्या या कार्यक्रमात शिस्त, ऊर्जा आणि उत्साह कायम राहिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेक्रेटरी डॉ. ओंकार बेल्लारीकर, खजिनदार डॉ. अभिजीत दुधाळ, महिला प्रतिनिधी डॉ. स्नेहल जोशी यांच्यासह डॉ. सुभाष उतेकर, डॉ. समीद चिकटे, डॉ. स्वप्निल रेपाळ, डॉ. प्रसाद खातू, डॉ. प्रसाद दळी, डॉ. ज्ञानेश्वर खांबे, डॉ. संतोष पाटील, डॉ. चैतन्य खोत आदींनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डॉ. अजित दाभोळकर, संतोष दाभोळकर, डॉ. दीपक विखारे, डॉ. मिर्लेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. चिपळूण तालुक्यातील बहुसंख्य डॉक्टरांनी कुटुंबीयांसह उपस्थिती लावून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. उपस्थित मान्यवरांनी उत्कृष्ट नियोजन व दर्जेदार सादरीकरणाबद्दल संपूर्ण सिजीपीए कमिटीचे मनापासून अभिनंदन केले. टीम सिजीपीए तर्फे सर्व डॉक्टर, कुटुंबीय, कलाकार, खेळाडू आणि सहभागी प्रत्येक व्यक्तीचे आभार मानण्यात आले. सिजीपीए परिवार अशाच एकजुटीने, उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेसह पुढील वाटचाल करीत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments