रत्नागिरी:रत्नागिरी जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री २०२५’ ला पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या या प्रदर्शनात तब्बल ६३ लाख ५१ हजार ९७३ रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. यामध्ये ५० लाख ४० हजार ६८ रुपयांची उत्पादन विक्री, तर १३ लाख ११ हजार ९०५ रुपयांची खाद्यपदार्थांची विक्री झाली आहे.
८३ स्टॉल्सना ग्राहकांची पसंती ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळावे आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता यावेळी एकूण ८३ स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये ६४ स्टॉल्स विविध उत्पादनांचे तर १९ स्टॉल्स खाद्यपदार्थांचे (Food Stalls) होते.
‘कोकणी मेव्या’ची धूम या प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना ग्राहकांनी पसंती दर्शविली. यामध्ये प्रामुख्याने:
-
कलात्मक वस्तू: बुरुड काम, गोधडी, लोकरीचे विणकाम, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी.
-
खाद्यपदार्थ: घरगुती मसाले (मच्छी/मटण मसाला), विविध पिठे, पापड (नाचणी, उडीद, सोयाबीन इ.), लोणची, कोकम, आगळ.
-
कोकणी मेवा: काजूगर, काजू मोदक, आंबावडी, फणसपोळी, तळलेले गरे.
-
कोकणी जेवण: मोदक, आंबोळी, थालीपीठ, घावणे, नारळवडी आणि अस्सल शाकाहारी-मांसाहारी जेवण.
-
नर्सरी: आंबा, काजू, नारळ, चिकू यांची कलमे आणि शोभिवंत फुलझाडे.
सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचा उत्साह प्रदर्शन कालावधीत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रभाग संघातील महिला, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह पर्यटकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. बासरी वादन, कथ्थक आणि गीत गायनाने उपस्थितांची मने जिंकली.
विविध स्पर्धांचा निकाल (विजेते)
प्रदर्शन कालावधीत महिलांसाठी पाककला, स्टॉल मांडणी आणि विक्री स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे निकाल खालीलप्रमाणे:
१. पाककला स्पर्धा (गोड पदार्थ):
-
प्रथम: अर्चना संतोष साळवी
-
द्वितीय: अस्मिता बिपीन तोडणकर
-
तृतीय: प्रियांका निलेश बहुतले
२. पाककला स्पर्धा (तिखट पदार्थ):
-
प्रथम: पायल प्रशांत कदम
-
द्वितीय: स्वरा वैभव देसाई
-
तृतीय: रविना कल्पेश गायकवाड
३. उत्कृष्ट स्टॉल मांडणी:
-
प्रथम: धनलक्ष्मी स्वयंसहाय्यता समूह
-
द्वितीय: सृष्टी स्वयंसहाय्यता समूह
-
तृतीय: नारीशक्ती स्वयंसहाय्यता समूह
-
उत्तेजनार्थ: श्रेय महिला उत्पादक गट
४. उत्कृष्ट विक्री (उत्पादने):
-
प्रथम: भक्ती स्वयंसहाय्यता समूह
-
द्वितीय: कोकण कलश महिला शेतकरी उत्पादक कंपनी
-
तृतीय: उद्योगरत्न महिला प्रभागसंघ
५. उत्कृष्ट विक्री (फूड स्टॉल):
-
प्रथम: संकल्प स्वयंसहाय्यता समूह
-
द्वितीय: धनज्योती महिला प्रभागसंघ
-
तृतीय: भरारी स्वयंसहाय्यता समूह



