Saturday, May 2, 2026
Google search engine
Homeकोकणसैनिक कल्याण विभागात भरती, ९ जानेवारीपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

सैनिक कल्याण विभागात भरती, ९ जानेवारीपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण विभागातील ‘लिपिक टंकलेखक’ (गट-क) सरळसेवा पदभरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना आता ९ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी दिली आहे.

मुदतवाढीचे कारण: सैनिक कल्याण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव दिनांक २६ डिसेंबर २०२५ पासून निष्क्रिय झाले होते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना वेबलिंकपर्यंत पोहोचता येत नव्हते आणि अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

महत्त्वाच्या सूचना:

  • अंतिम तारीख: ०९ जानेवारी २०२६ (रात्री २३.५९ वाजेपर्यंत).

  • कोणी अर्ज करावा: जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या भरतीचा लाभ घ्यावा.

अर्ज करण्यासाठी नवीन लिंक: उमेदवारांनी जुन्या संकेतस्थळावर न जाता, खालील दिलेल्या डायरेक्ट लिंकचा (Web Link) किंवा QR कोडचा वापर करून अर्ज भरावेत:

अर्जाची लिंक: https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html

जिल्ह्यातील सर्व पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments