श्री स्वयंभु शंकर पार्वती काळकाई मानाई मंदिर बिजघर येथे आज महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम
चिपळूण (संतोष उर्फ राज पिलके ): खेड तालुक्यातील बिजघर गावचे जागृत देवस्थान
श्री स्वयंभु शंकर पार्वती काळकाई मानाई मंदिर बिजघर येथे महाशिवरात्री उत्सव २०२६ निमित्त आज १५ व उद्या १६ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने बिजघर गावचे सर्वदूर असणारे चाकरमानी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
सालाबादप्रमाणे यावर्षी ही भक्ती आणि शक्तीच्या अनोख्या संगमातून सर्वांच्या सहकार्याने महाशिवरान्नी उत्सव रविवार दि. १५ रोजी
सकाळी ६ वा.अभिषेक,
दुपारी २ ते ५ वा.मुलांचे स्पर्धा कार्यक्रम,सायंकाळी ६.३० ते ७.३० वा.बिजघर (सुतारवाडी) हरिपाठ भजन,रात्रौ ८.३० ते ११.३० वा.कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन,रात्रौ ११.३० वा.पुजा व महाआरती आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
तसेच सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते १० वा.शिवप्रतिमेचे पुजन सकाळी १० ते १२ वा.महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ,दुपारी १ ते २.३० वा.
महाप्रसाद आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
विशेष आकर्षण
रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री. ८.३० ते ११.३० वा.वाघदेवी नमन नाट्य मंडळ निवळी यांचे प्रसिद्ध कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी या कार्यक्रम प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण समस्त बिजघर ग्रामस्थ व भक्तगण श्री शंकर पार्वती काळकाई-मानाई मंदिर, बिजघर, ता. जि. रत्नागिरी यांनी केले आहे.



