गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजरत्न पुरस्काराचे वितरण..!
नागपूर (विशेष प्रतिनिधी): कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे राजरत्न पुरस्काराचे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले.
श्रीमंत श्री रघुराजे भोसले स्मृतीप्रित्यर्थ राजरत्न पुरस्कार वितरण सोहळा त्यांचे वंशज डॉ.मुधोजीराजे भोसले यांनी नागपूरमध्ये आयोजित केला होता. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून गुरुमाऊली श्री. मोरे व मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते.
क्रीडा, साहित्य, पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘राजरत्न पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा देताना सत्कारमूर्तींचे कौतुक केले आणि गुरुमाऊली श्री. मोरे यांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला.
मुख्यमंत्र्यांनी,परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. राज्याचे हित, विकासाचे प्रश्न आणि समाजाच्या सर्व घटकांच्या उन्नतीसाठी गुरुमाऊलींनी मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद दिले. अत्यंत नियोजनबद्धपणे हा कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. श्री मुधोजीराजे भोसले यांच्या या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणासाठी गुरुमाऊलींनी अस्सल रुद्राक्षांची माळ घालून त्यांचा यथोचित गौरव केला.



