Saturday, May 2, 2026
Google search engine
Homeकोकणमराठा महाकुटुंब,चिपळूण यांच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज भव्य जन्मोत्सव सोहळा...

मराठा महाकुटुंब,चिपळूण यांच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज भव्य जन्मोत्सव सोहळा आयोजन बाईक व कार रॅली,ऐतिहासिक वेशभूषा व साहसी खेळांचे प्रदर्शन भव्य रॅली,”गर्जा महाराष्ट्र माझा” सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांचे भारदस्त आयोजन

मराठा महाकुटुंब,चिपळूण यांच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज भव्य जन्मोत्सव सोहळा आयोजन

बाईक व कार रॅली,ऐतिहासिक वेशभूषा व साहसी खेळांचे प्रदर्शन भव्य रॅली,”गर्जा महाराष्ट्र माझा” सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांचे भारदस्त आयोजन

चिपळूण (राज पिलके ) :
मराठा महाकुटुंब,चिपळूण यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज भव्य जन्मोत्सव सोहळा आयोजन गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.
यादिनी सकाळी १०.०० वा महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून भव्य बाईक व कार रॅलीला सुरुवात होणार आहे. सदर रॅलीचा
मार्कडी पासून शुभारंभ होणार असून त्यानंतर बहादुरशेख,पावरहाऊस,खेंड व शेवटी नगरपरिषद अशा मार्गाने ही रॅली निघणार आहे.
त्यानंतर दुपारी ३:०० वा
भव्य शोभायात्रा नगरपरिषद ते छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा मार्कंडी अशी निघणार आहे.यामध्ये पारंपारिक शिव वेशभूषा, साहसी खेळाचे प्रात्यक्षिक, पारंपरिक ढोल ताशा,पारंपरिक गोंधळी संभळ पथक व तुतारी वादन, अश्वनृत्य व हलगी असे विविध वेशभूषा व साहसी खेळांचे प्रदर्शन करत ही रॅली निघणार आहे.दरवर्षी ही रॅली चिपळूणकरांचे आकर्षण ठरत असते. दिवसेंदिवस या रॅलीचे स्वरूप भव्य दिव्य अशा पद्धतीने होत असल्याचे दिसून येते.
सायं : ६:०० वा.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.तसेच
महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर सायं ७:००वा.मान्यवरांचे स्वागत व अल्पोपहार कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.चिपळूण नगरपरिषदतर्फे
सायं ८:०० वा.सांस्कृतिक कार्यक्रम “गर्जा महाराष्ट्र माझा” हा प्रसिद्ध कार्यक्रम होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मराठा रियासत प्रतिष्ठान,चिपळूण आणि मराठा महकुटुंब चिपळूण तालुका यांच्यावतीने उत्तमरित्या व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments