Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*क्रेटा कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक; सावर्डे पोलिसांची कारवाई* *दोघे ताब्यात, ५...

*क्रेटा कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक; सावर्डे पोलिसांची कारवाई* *दोघे ताब्यात, ५ लाख ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त*

चिपळूण (प्रतिनिधी) : गोव्यातून सिंधुदुर्गमार्गे चिपळूणकडे येणाऱ्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीवर सावर्डे पोलिसांनी कारवाई करत दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या कारवाईत वाहनासह एकूण सुमारे ५ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून एका क्रेटा कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावर्डे पोलिसांनी पोलीस ठाण्यासमोर सापळा रचत आज दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई–गोवा महामार्गावर संबंधित वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता गाडीत विदेशी मद्याच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी रॉयल स्टॅगचे ३२ बॉक्स तसेच मॅकडॉलचे १० बॉक्स असा एकूण ४२ बॉक्सचा साठा जप्त केला. यासोबतच संबंधित क्रेटा कारही ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जप्त केलेल्या मद्य व वाहनाची एकत्रित किंमत अंदाजे ५ लाख ८६ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या अवैध वाहतुकीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू असून संबंधितांकडून अधिक चौकशी केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments