Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिपळुणात आगीपासून वाचल्या १० बसेस

चिपळुणात आगीपासून वाचल्या १० बसेस

चिपळूण – येथील मध्यवर्ती बसस्थानका समोर रस्त्यालगत पार्किंग केलेल्या १० खासगी बसच्या आवारात गवताला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री १२ वाजता घडली. ही आग इतकी भीषण होती की नजिकच्या बसलाही त्याची मोठी झळ बसली. आगीच्या तिव्रतेमुळे बसेसच्या काचा फुटल्या असून इलेक्ट्रीक वायरिंग देखील जळली आहे. मात्र नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाने उपायोजना करत आग वेळीच नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकासमोरील अरिहंत कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या गवत व कचऱ्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले. अरिहंत कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास असलेले अ‍ॅड. चिन्मय दीक्षित यांनी प्रसंगावधान राखत तातडीने ही बाब खाजगी बस चालक मंदार लाड यांना कळवली. यानंतर मंदार लाड त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पाठवला आणि स्वतःही आगीच्या ठिकाणी दाखल झाले. आग भडकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून रात्री एक वाजेपर्यंत पाणी मारण्यात आले. या ठिकाणी दहा ट्रॅव्हल्स बसेस उभ्या होत्या, ज्या चिपळूण–रत्नागिरी मार्गावर प्रवास करतात. मंदार लाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आपापल्या गाड्या तातडीने बाजूला काढल्या. मात्र काही बसेसना आगीची झळ बसली. यातील काही गाड्यांचे लाईट्स वितळले, तर काहींच्या काचा फुटल्या आहेत. नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मंदार लाड व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली. अन्यथा दहा बसेस जळून खाक होण्यासोबतच अरिहंत कॉम्प्लेक्स या इमारतीला देखील मोठा धोका निर्माण झाला असता. वेळीच करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments